Fri. May 7th, 2021

आलिया भट्ट पुन्हा एकदा आव्हानात्मक भूमिकेत, ‘गंगूबाई काठियावाडी’चं पोस्टर प्रदर्शित

आलिया भट्ट (Alia Bhatt) पुन्हा एकदा धमाकेदार भूमिकेसाठी सज्ज झाली आहे. यावेळी संजय लीला भन्साळीसारख्या टॉपच्या दिग्दर्शकाच्या आगामी सिनेमात आलिया दिसणार आहे. या सिनेमाचं नाव आहे ‘गंगूबाई काठीयावाडी’. (Gangubai Kathiyawadi) या सिनेमाची पोस्टर्स प्रदर्शित झाली आहेत. या सिनेमात ती माफिया क्वीन दिसणार असल्याचं पोस्टरवरून समजतंय.

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhatt) यांच्या सिनेमातील पात्रं नेहमीच पॉवरफुल असतात. दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांना घेऊन संजय लीला भन्साळी यांनी तीन ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. त्यामुळे पुढील सिनेमा कोणता असणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. तसंच आलिया भट्टदेखील (Alia Bhatt) सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. ती एकाहून एक आव्हानात्मक भूमिका करून आपली अभिनयक्षमता दाखवून देतेय. त्यामुळे संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांच्या एकत्र येण्याने एक चांगला सिनेमा बघायला मिळेल, असं एकूण चित्र आहे. या सिनेमात आलिया भट्टसोबत सलमान खान (Salman Khan) दिसणार होता, मात्र आता तो या सिनेमात नाही. दोन्ही पोस्टर्समध्ये आलिया भट्टच (Alia Bhatt)दिसत आहे. हा चित्रपट 11 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *