रणबीर-आलिया झाले ट्रोल…

आज रणधीर कपूर यांचा ७४वा वाढदिवस आहे. काल रात्री १२ वाजता संपूर्ण कपूर कुटुंबीय एकत्र जमले होते. त्यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते. त्यावेळी तेथे रणबीर आणि आलिया देखील उपस्थित होते आणि सध्याच रणधीर कपूर यांचा छोटा भाऊ आणि रणबीर कपूरचे काका राजीव कपूर यांचे पाच दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. तरही कुटुंबीयांनी पार्टीचे आयोजन केल्यामुळे नेटकरी संतापले आहे कारण ९ फेब्रुवारी रोजी राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते.
रणबीर कपूर काका राजीव कपूर यांच्या अगदी जवळचा असल्याचं म्हटलं जातं आहे. यामुळे नेटकऱ्यानी रणबीर आणि आलिया ट्रोल करणं सुरू केले आहे. एका यूजरने, ‘धक्कादायक, राजीव कपूर यांच्या निधनाला एक आठवडाही झाला नाही आणि हे लोकं पार्टी एन्जॉय करतायेत’ असे कमेंट करत म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने किती स्वार्थी आणि निर्दयी आहेत हे लोकं अशी कमेंट केली आहे. या पार्टीत रणधीर कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त आलिया भट्ट, रणबीर कपूर, करीना कपूर खान, सैफ अली खान, नीतू कपूर, तारा सुतारिया, करिश्मा कपूर, रिद्धिमा कपूर, संजय कपूर हे उपस्थित होते.