बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट झळकणार साऊथच्या ‘या’ सिनेमात

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आता साऊथ आलिया भट्ट लवकरच साऊथच्या सिनेमात झळकणार आहे.

‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या ‘RRR’ या आगामी सिनेमात आलिया भट्टची एन्ट्री झाली आहे.

अनेकांचा या बातमीवर विश्वास बसणार नाही. कारण काल-परवापर्यंत आलियाने राजमौलींच्या ‘RRR’ची ऑफर नाकारली, अशी बातमी होती. पण आता बातमी एकदम खरी आहे.

खुद्द राजमौली यांनीच आलियाच्या एन्ट्रीची अधिकृत घोषणा केली आहे.

हैदराबादेत मीडिया टुडेशी बोलताना राजमौलींनी ही घोषणा केली. ‘RRR’साठी आम्ही आलियाला साईन केले आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईत आम्ही आलियाला भेटलो आणि आपल्या प्रोजेक्टची ऑफर दिली. हा प्रोजेक्ट आलियाला आवडला आणि तिने यात काम करण्यास होकार दिला.

या सिनेमात आलिया भट्ट रामचरणच्या अपोझिट दिसेल. आलिया आमच्या सिनेमात काम करणार, याचा आम्हाला आनंद आहे, असे राजमौलींनी सांगितले आहे.

‘RRR’च्या ट्विटरवरच्या ऑफिशिअल पेजवरही याची घोषणा करण्यात आली आहे.

‘बाहुबली’नंतर राजमौलींचा ‘RRR’ हा सिनेमा रिलीज होतोय.

तेलगू सिनेमाचे दोन मोठे सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण या सिनेमात लीड रोलमध्ये आहेत.

Exit mobile version