Fri. Apr 23rd, 2021

आलियाच्या आईचा थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना केला सवाल

सोनी राजदान यांचे ट्वीट सध्या चर्चेत आले आहे. देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. शिवाय यामध्ये महाराष्ट्र अव्वल असून देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात आहेत. शिवाय वाढत्या कोरोनाच्या पादुर्भावामुळे महाराष्ट्रातील रूग्णांच्या संख्येमुळे सर्वच नागरिक चिंता व्यक्त केली जात आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी वाढत्या कोरोना रुग्णांबाबत चिंता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सवाल केला आहे.

सोनी राजदान यांनी ट्वीट हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना टॅग करत, ”१६ ते ४० या वयोगटातील लोक कामासाठी घराबाहेर पडत आहेत. तसेच या वयोगटातील लोक नोकरी, बार, नाईट क्लब (बार आणि नाईट क्लबमध्ये बऱ्याच वेळा मास्क न लावता) अशा ठिकाणी जातात. मला कळत नाही प्रथम त्यांना कोरोना प्रतिबंधक लस का दिली जात नाही?”‘असा प्रश्न विचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *