आलिया भट्टचं टोपण नाव ऐकून तुम्हालाही येईल हसू

बॉलिवूडची गोड परी म्हणजेच आलिया भट्ट आणि रणवीर सिंगने द कपिल शर्मा शोमध्ये नुकतीच हजेरी लावली होती.

“द कपिल शर्मा” मध्ये अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग आगामी चित्रपट ‘गली बॉय’च्या प्रमोशनासाठी आले होते.

त्यावेळी त्या दोघांनी चाहत्यांसोबत खूप गप्पा मारल्या आणि चित्रपटातील गाण्यांवर नृत्य केले.
“द कपिल शर्मा” शोच्या वेळी  कपिलने आलियाला एक प्रश्न केला की, आपल्या कुटुंबियाचे किंवा मित्र-मैत्रिणींचे फोन नंबर कोणत्या टोपण नावाने सेव्ह केले आहेत का?

काय दिले आलियाने उत्तर?

कपिलच्या या प्रश्नावर आलिया म्हणते की, माझ्या काही मित्र-मैत्रिणींनी माझे नाव आलू-बटाटा,आलू-भजिया,आलू- पापड असे सेव्ह केले आहे.

कारण माझे टोपण नाव आलू आहे.

त्यामुळे प्रत्यक्षात मी बटाट्यासारखीच आहे.

बटाट्याप्रमाणेच माझे देखील सर्वांसोबत छान जमते.

यानंतर सगळेच आलियाची खिल्ली उडवत होते.

 

 

 

Exit mobile version