Sat. Feb 29th, 2020

अडीच वर्षांच्या चिमुरडीने सर केला कलावंतिणीचा सुळका

राज्यात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गडकिल्ले सर करणारी हौशी गृपची संख्या वाढलेली आहे. अनेक जण हौस म्हणून तर काही जण थरार अनुभवण्यासाठी किल्ल्यांची सफर करतात.

काही जणं सहजरित्या किल्ला सर करतात. तर काहींना सुरुवातीलाच घाम फुटतो.

परंतु अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुरडीने प्रबळगडचा अवघड असा कलावंतीणीचा सुळका सर केला आहे.

या अडीच वर्षाच्या चिमुरडीचं शर्विका म्हात्रे असं नाव आहे. शर्विका ही मूळ अलिबागची आहे.

कलावंतीणीचा सुळका हा गिर्यारोहकांच्या हिंमतीला चॅंलेज देणारा ट्रेक समजला जातो. हा सुळका चढण्यासाठी फार कठीण आहे. त्यामुळे अनेक पारंगत गिर्या रोहकांची देखील भंबेरी उडते.

पण शार्विकाने हा सुळका सर करुन आपल्या हिंमतीचे दर्शन करुन दिले आहे.

त्यामुळे शार्विकाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *