Thu. Sep 29th, 2022

राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने गेल्या तीन दिवसांपासून विश्रांती घेतल्याने पंचगंगेची नदी झपाट्याने उतरु लागली आहे. राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे काल रात्री बंद झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आता केवळ पायथा वीजगृहातून १६००रू आहे. दुसरीकडे रविवारी सकाळी १० वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी ४० फुट १० इंच इतकी होती. त्यामुळे रविवारी दिवसभरात पावसाची उघडीप राहिल्यास पंचगंगा इशारा पातळीवरून खाली येण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अजूनही एकूण दरवाजे ६१ पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीवरील पाणीपातळी तासागणिक कमी होत चालली आहे. दरम्यान, सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस झाला असला, तरी प्रमाण अल्प असल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यातील जांबरे, चित्री मध्यम प्रकल्प आणि कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तुळशी धरणातून विसर्ग कमी केला आहे.
आज सकाळी सात वाजल्यापासून तुळशी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाल्याने सध्या सुरु असलेला ९०० क्यूसेक्स विसर्ग कमी करून तो ४०० क्यूसेक्स इतका करण्यात आल्याची माहिती तुळशी धरण प्रशासनाने दिली आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. धरणाचा एकूण साठा ९२.५९ टीएमसी झाला आहे. त्यामुळे धरणात होणारी आवक लक्षात घेऊन आजपासून धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटावरून साडेचार फुटांवर उचलले जाणार आहेत. त्यामुळे कोयना नदीपात्रात ३० हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.