‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ला अनेक पक्षांचा पाठिंबा!

‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या संकल्पनेवर आज पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मात्र काँग्रेससह अनेक पक्षाने या बैठकीला दांडी मारली होती. या बैठकीत पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनेक पक्षांनी पाठिंबा दिलाय. या करीता एका समितीची स्थापना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही माहिती दिली. ‘माकप, भाकपने वेगळी भूमिका मांडली. मात्र त्यांनी या संकल्पनेला विरोध केला नाही’, असंही त्यांनी म्हटल.
बैठकीवर या नेत्यांचा बहिष्कार
राहूल गांधी, काँग्रेस नेते
ममता बनर्जी, मुख्यमंत्री पश्चिम बंगाल
मायावती, बसपा
एम के स्टालिन, द्रमुक
के चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री तेलंगणा
एन चंद्रबाबू नायडू, नेते टीडीपी
अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री दिल्ली
बैठकीला हे नेते उपस्थित होते
शरद पवार, राष्ट्रवादी नेते
सीताराम येचुरी, माकप
एस सुधाकर रेड्डी,भाकप
नवीन पटनायक, मुख्यमंत्री ओडीसा
नितीश कुमार, मुख्यमंत्री बिहार
फारुख अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फर्रन्स
सुखबीर बादल, अकाली दलचे
महबूबा मुफ्ती, पीडीपी
जगन रेड्डी, वायएसआर कॉंग्रेसचे
बैठकीला येणे शक्य न झालेले नेते
उद्धव ठाकरे, शिवसेना कार्याध्यक्ष