Tue. Jul 14th, 2020

आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वेच्या विविध कामांसाठी आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असल्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक बघून प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने दिला आहे. तसेच लोकल 15 ते 20 मिनिटांनी उशिरा असतील.

तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक –

मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11:20 ते दुपारी 3.50 पर्यंत असणार आहे.

तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत असणार आहे.

पश्चिम मार्गावर बोरिवली ते भाईंदर अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे.

पश्चिम मार्गावर जम्बो ब्लॉकमुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

तर अंधेरी स्थानकावर फूट ओव्हरब्रिजच्या गर्डरच्या कामासाठी  २५ ऑगस्ट रात्री ते २६ ऑगस्ट सकाळी 4 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *