Tue. Jul 27th, 2021

मृतदेहांची विल्हेवाट लावण्याबाबतची याचिका न्यायालयानं फेटाळली

प्रयागराजमधील गंगा नदीवरील घाटांवर नदीतून वाहून येणाऱ्या मृतदेहांची विल्लेवाट लावण्यात येत होती. मात्र शुक्रवारी या संदर्भात दाखल केलेली याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ‘त्या परिसरात वेगवेगळे समुदाय वेगवेगळ्या पध्दतीने अंत्यसंस्कार करत असतात. तुम्ही याबाबत कोणताही अभ्यास केला नाही. त्यांमुळे तुमची याचिका फेटाळली जात आहे. अभ्यास करुन पुन्हा याचिका दाखल करा’ – असे याचिकाकर्ताला सुनावले गेले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिका कर्त्याचे वकील प्रणवेश यांना विचारले की, एखाद्या कुटुंबात मृत्यू झाला असेल तर अंत्य संस्कार करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे का? तसेच न्यायालयान याचिकाकर्ताला विचारले की अशा परिस्थितीमध्ये त्यांनी स्वत: काय केले? शवांची ओळख पटवून किती अंत्यसंस्कार केले,असाही सवाल न्यायालयानं केलाय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *