Thu. Jun 17th, 2021

‘प्रेक्षकांचं प्रेम मिळवण्यासाठी मी संघर्ष केलाय…’

‘नेपोटिझम’ (Nepotism) म्हणजे वशिलेबाजी हा शब्द सिनेसृष्टीत सध्या चांगलाच गाजतोय. फिल्मी घराण्यातीलच व्यक्तींना सिनेमांत काम देण्याच्या वशिलेबाजीविरोधात आता Bollywood मध्ये अनेकजण आवाज उठवत आहेत. हाच प्रकार दक्षिण भारतीय सिनेमांतही होतोय. यासंदर्भात तेलुगू सिनेसृष्टीतील (Tollywood) प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याला विचारलं असता त्याने स्पष्ट उत्तर दिलं, की वडील निर्माते असल्यामुळेच मला पहिले काम मिळालं.

आपल्या भन्नाट डान्समुळे चाहत्यांमध्ये गाजणारा अभिनेता अल्लू अर्जुन सध्या आपल्या ‘एला वैकुंठापुरामाल्लू’ (Ala Vaikunthapurramuloo) या सिनेमाचं प्रमोशन करतोय. यावेळी त्याला नपोटिझम बद्दल विचारलं असता आपण नेपोटिझमचे ब्रँड एंबेसेडर असल्याचं त्याने गमतीने म्हटलं.

माझे वडील मोठे निर्माते असल्यानेच मला पहिलं काम मिळालं.

माझा अभिनय तितकासा चांगला नसल्याची माझ्यावर तेव्हा टीकाही झाली.

मग मात्र पुढच्या सिनेमांसाठी मी इतर स्ट्रगलर्सप्रमाणे ऑडिशन देऊन काम मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागलो.

मिळणाऱ्या संधीचा आदर करून स्वतःच्या अभिनयावर मेहनत घेऊ लागलो.

पहिलं काम जरी नेपोटिझममुळे मिळालं असलं, तरी प्रेक्षकांचं प्रेम मिलवण्यासाठी मला संघर्षच करावा लागलाय.

मी प्रचंड संघर्ष करूनच चाहत्यांचं प्रेम मिळवलंय, असं अल्लू अर्जुनने म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *