Tue. Dec 7th, 2021

‘या’ सुपरस्टारची नवी कार, सगळ्या Bollywood स्टार्सपेक्षा भारी!

Bollywood चे सुपरस्टार्स यांच्या मोठमोठ्या कार्सतर असतातच, पण त्या ताफ्यात सर्वांत जास्त महागडी आणि प्रसिद्ध असते ती त्यांची व्हॅनिटी व्हॅन. व्हॅनिटी व्हॅन म्हणजे या सुपरस्टार्सचं दुसरं घरच असतं. या व्हॅनमध्ये सर्व सुखसुविधा असतात. बेडरूम, मेक-अप रूम, टॉयलेट, एसी, फ्रीज अशी सगळी सोय या व्हॅनिटी व्हॅनमध्ये असते. आता बॉलिवूडच्या सर्वा टॉपच्या अभिनेत्री आणि अभिनेते व्हॅनिटी व्हॅन तयार करून घेतात आणि त्यातूनच सेटवर प्रवास करतात. मराठीतील काही कलाकारही आता व्हॅनिटी व्हॅन घेऊ लागले आहेत. मात्र केवळ मराठीच नव्हे, तर बॉलिवूडच्या टॉपच्या कलाकारांपेक्षाही भारी व्हॅनिटी व्हॅन आहे ती तेलुगू फिल्म इंड़स्ट्रीतल्या स्टायलिश स्टारकडे… हा सुपरस्टार म्हणजे अल्लू अर्जुन!

 

View this post on Instagram

 

It’s Sexy & I Love it 🖤 #AAFALCON

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline) on

Bollywood सुपरस्टार्सपेक्षा भारी कार!

स्टायलिश स्टार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अल्लू अर्जुनकडे एकाहून एक स्टायलिश कार्स आहेत.

मात्र त्याने आता एक नवी व्हॅनिटी व्हॅन बनवून घेतली आहे.

या व्हॅनिटी व्हॅनची किंमत चक्क 7 कोटी रुपये आहे.

एवढी महागडी व्हॅनिटी व्हॅन शाहरूख, सलमानसारख्या बॉलिवूडच्या टॉपच्या सुपरस्टार्सकडेही नाही.

 

‘आर्या’ सिनेमाला झाली 15 वर्षं, काय म्हणाला ‘अल्लू अर्जुन’?

 

ही व्हॅन अल्लू अर्जुनने Reddy Custom द्वारे स्वत:साठी बनवून घेतली आहे.

या व्हॅनवर अल्लू अर्जुनची ओळख असणारा ‘AA’ हा लोगोही लावण्यात आहे.

ही व्हॅन आतून-बाहेरून Black आहे. या व्हॅनचा रंग काळाच असून आतमधूनही काळ्याच रंगाची थीम ठेवली आहे.

अल्लू अर्जुन सध्या आपल्या एकोणीसाव्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. अल्लू अर्जुनचे सिनेमे जरी तेलुगू भाषेतील असले, तरी हिंदी डबिंगमुळे तो आता देशभरात लोकप्रिय झाला आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *