Fri. May 7th, 2021

#MeToo वर आता सिनेमा, न्यायाधिशाच्या भूमिकेत स्वतः आरोपी आलोक नाथ!

ट्विटरवर #MeToo चांगलाच गाजला. या हॅशटॅगला लैंगिक शोषणविरोधी मोहिमेचं स्वरूप प्राप्त झालं. या #MeToo मुळे बॉलिवूडमधील अनेक नामांकीत सेलिब्रिटींचा पर्दाफाश झाला होता. यामध्ये धक्कादायक ठरलेलं एक नाव म्हणजे बॉलिवूडचा लोकप्रिय संस्कारी चेहरा बाबूजी म्हणजेच अलोक नाथ यांचं. Memes च्या दुनियेत आपल्या अतिसंस्कारी इमेजमुळे गाजलेले आलोकनाथ यांच्यावरच लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाला आणि त्यांना फरार व्हावं लागलं होतं. विरोधाभास म्हणजे आता या #MeToo प्रकरणावरच एक सिनेमा बनत आहे आणि या प्रकरणातील आरोपी आलोक नाथ या सिनेमात काम करत आहे… ते ही न्यायाधिशाचं.

आलोक नाथ म्हणतायत ‘#मैभी’

‘#मैभी’ असं या सिनेमाचं नाव आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन नासिर खान करत आहे.

निर्मात्यासाठी आपण ही छोटीशी भूमिका साकारली असल्याचं आलोक नाथ यांनी म्हटलं आहे.

मात्र ते या सिनेमात जजची भूमिका साकारत असल्याचं कळल्यावर लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली.

याबद्दल बोलताना मी #मैभी ससिनेमात झळकणार म्हटल्यावर तुम्हाला इतकं का दु:ख होतंय, असा सवास त्यांनी केलाय.

हा चित्रपट प्रदर्शित होऊ द्या, म्हणजे तुमचे गैरसमज दूर होतील.

न्यायाधिशाची व्यक्तिरेखा लहानशी असली, तरी विनयभंगावर महत्त्वाचं भाष्य करताना तो दिसेल.

या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत खालिद सिद्दीकी, शावर अली, इम्रान खान, मुकेश खन्ना आणि शाहबाज खान हे कलाकार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *