‘अंधाधुन’ या वर्षातील सर्वोत्तम सिनेमा, तर ‘बधाई हो’ टॉप 10 मध्ये

सिनेसृष्टीत अत्यंत प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या IMDB वेबसाईटने 2018 सालातील 10 सर्वोत्कृष्ट भारतीय सिनेमांची यादी जाहीर केली आहे. यात प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेल्या सिनेमांच्या यादीत 6 बॉलिवूडमधील चित्रपटांचा समावेश करण्यात आलाय. ‘अंधाधुन’ हा या वर्षातील बॉलिवुडमधील सर्वोत्तम सिनेमा ठरला असून टॉप 10 सिनेमांच्या यादीत हा सिनेमा पहिल्या स्थानी आहे. तर ‘स्त्री’, ‘पॅडमॅन’, ‘बधाई हो…’ या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या सिनेमांचा देखील या यादीत समावेश आहे.

‘बधाई हो’ या चित्रपटात आयुषमान खुराना, नीना गुप्ता, सान्या मल्होत्रा अशी तगडी स्टारकास्ट आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा अपेक्षेपेक्षाही कित्येकपट जास्त प्रतिसाद मिळालाय. तर या मध्यम बजेटमध्ये बनवलेल्या सुपरहिट सिनेमांबरोबरच अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित ‘संजू’ आणि आलिया भट्टच्या तडाखेबंद अभिनयाने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘राजी’ सिनेमानेही टॉप 10 च्या यादीत स्थान पटकावलं आहे.

आयएमडीबीच्या या यादीत प्रेक्षकांनी चांगली रेटींग दिलेल्या प्रादेशिक भाषेतील सिनेमांचाही समावेश करण्यात आला आहे. 25 लाख लोकांच्या रेटिंग्सच्या आधारे ही यादी बनवण्यात आली आहे. आयएमडीबी या वेबसाइटला दर महिन्याला २५ लाखाच्या आसपास लोक व्हिजिट करतात.

Exit mobile version