Thu. Jun 17th, 2021

अमरावतीत म्यूकरमायकॉसीसचे रुग्ण आढळल्याने खळबळ

अमरावती: अमरावती जिल्ह्यात म्यूकरमायकॉसीसचे १० रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या १० रुग्णांपैकी ४ रुग्ण बरे झाले असून अन्य ६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. म्यूकरमायकॉसीस हे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन आहे,त्यामुळे रुग्णांची फुफुसांची क्षमता वाढवण्यासाठी टि बी रुग्णालय परिसरात पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले आहे.

या ठिकाणी रुग्णांना व्यायाम, योगा शिकवले जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप रणमले यांनी दिली.तूर्तास जिल्ह्यात म्यूकरमायकॉसीसचा एकही रुग्ण दगावला नाही,अशी माहितीसुद्धा जिल्हा आरोग्य अधिकारी रणमले यांनी दिली आहे.मात्र या घटनेमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *