Sat. Oct 1st, 2022

डॉक्टरांच्या पुढाकाराने कोरोना मृतकांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

अमरावती: कोरोनामुळे देशात दररोज हजारो लोक मृत्यूमुखी पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी मृताचे नातेवाईकसुद्धा आपल्या आप्तांच्या अंत्यसंस्कारासाठी पुढे सरसावत नसल्याचं दिसून येत असतानाच अनेक सामजिक कार्यकर्ते मात्र सेवाभावी वृत्तीने काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील काही जणांनी पुढाकार घेत ‘माणुसकी  संघ’ नावाचा एक उपक्रम सुरू केला असून कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे.

दर्यापूर येथील एकता रुग्णालयाचे संचालक डॉक्टर इकबाल पठाण यांच्या नेतृत्वात तालुक्यातील काही युवकांनी एकत्र येत माणुसकी संघ नावाने एक गट तयार करून तालुक्यात हा गट कार्य करीत आहे. कोरोनाच्या भीतीने मृतदेहाजवळ जायला कुणीही तयार नसतांना हे तरुण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे कार्य करीत आहेत. या उपक्रमाद्वारे स्वतः खर्च करून आज पर्यंत दहा ते बारा रुग्णांचे विधिवत अंत्यसंस्कार पार पाडले आहेत. या कोरोनायोध्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.