Jaimaharashtra news

संतापजनक! पाच नराधमांचा बालिकेवर अत्याचार

अमरावती: अमरावती जिल्ह्यात महिला सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे एका १३ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. गेले काही महिने हे ५ नराधम या मुलीचं शोषण करत होते. अश्लील फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन नराधमांनी या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केला.

ही पीडिता ३ महिन्याची गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार पीडितेच्या आईच्या लक्षात येताच वरुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरुड पोलिसांनी या पाचही आरोपींना अटक केली आहे.तर या प्रकरणी बलात्कार आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संदर्भात अधिक तपास वरुड पोलीस करत आहेत.

Exit mobile version