Jaimaharashtra news

मोबाईलसाठी सख्ख्या नातवाने केला आजीचा खून

अमरावती: अमरावतीतील ब्राह्मणवाडा येथील ७५ वर्षीय वृद्धेचा मोबाईलसाठी तिच्या नातवानेच खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सूरज प्रल्हाद अमझरे असे आरोपीचे नाव आहे, तर गिरिजा आण्याजी अमझरे असे मृत महिलेचे नाव आहे.

मोबाईल घेण्यासाठी पैशाची चणचण असल्याने आपल्या सख्ख्या आजीच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर या गिरजाबाई आमझरे आजीचा मृतदेह घरातच पडून होता. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला होता .मात्र सुरुवातीला पोलिसांना मारेकऱ्यांचा शोध लागला नव्हता. दरम्यान पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली असता मारेकरी हा ओळखीतील व कुटुंबातील असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी येत होता .त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी संशयाच्या आधारे सुरज आमझरेला ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपीने खुनाची कबुली दिली.

पोलीस अधीक्षकांनी एलसीबी आणि स्थानिक पोलिसांना आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले होते. सूरज प्रल्हाद अमझरे याला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version