मजुराकडून प्रामाणिकपणाचे दर्शन

अमरावती: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणुसकीचं आणि प्रामाणिकपणाचं दर्शन घडवणारी एक घटना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात घडली.

मोर्शी तालुक्यातील एका मजुराला ९७ हजार रुपये सापडले होते. शासनाच्या रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या या मजूराने त्याला सापडलेली ही रक्कम पोलीस स्टेशनमध्ये जमा केली.

रामदास जिचकार असे या मजुराचे नाव आहे. हातावर पोट असणाऱ्या रामदास यांनी ९७ हजार रुपये इतकी मोठी रक्कम प्रामाणिकपणे पोलीस स्थानकात जमा केली. रामदास यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे मोर्शी पोलिसांकडून त्यांचा सत्कारदेखील करण्यात आला.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Exit mobile version