Sun. Jun 20th, 2021

अमरावतीत कोरोना चाचणी अहवालाला आता क्यूआर कोडचे कवच

अमरावती: पुणे, नागपूर, याठिकाणी कोरोना चाचणी अहवालात मोठा घोळ झाल्याचा प्रकार समोर आला होता, अमरावती जिल्ह्यात आता कोरोना चाचणी अहवाल कुणीही खोटा तयार करू शकणार नाही किंवा अशा खोट्या अहवलाद्वारे कुणी कोणाची फसवणूक करू शकणार नाही.

याचे कारण म्हणजे आता कोरोना चाचणी अहवालाला क्यूआर कोडचे कवच देण्यात आले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कोरोना नमुने चाचणी प्रयोगशाळेने हा महत्त्वाचा प्रयोग यशस्वी केला आहे. कोरोना अहवाल प्रमाणपत्रावर दोन क्यूआर कोड टाकण्यात आले आहे.

आता या सुरक्षित कोरोना अहवालाचा उपयोग आंतरराष्ट्रीय पातळीवरही महत्त्वाचा ठरणार, अशी माहिती कोरोना चाचणी प्रयोगशाळा प्रमुख डॉ. प्रशांत ठाकरे यांनी दिली. सॉफ्टवेअर केले विकसित क्यूआर कोड असणारे कोरोना अहवाल हे आयसीएमारच्या पोर्टलवर जनरेट होईल. यासाठी विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. क्यूआर कोड असणारे कोरोना अहवाल प्रमाणपत्र सुरक्षित असून या अहवालात कुठलाही बदल करता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *