Fri. Sep 30th, 2022

अमरनाथ यात्रेला पुन्हा सुरुवात

जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी होऊन मोठी दुर्घटना घडली होती. ढगफुटीमुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. आज सकाळी सोमवारी यात्रा पुन्हा सुरु झाली आहे. जम्मू बेस कँम्पवरून अमरनाथ यात्रेकरूंचा नवीन तुकड्यांनी येण्यास सुरुवात केली आहे. यात्रा पुन्हा सुरु झाल्याने यात्रेकरुंमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

अमरनाथ गुहेजवळ ८ जुलै रोजी ढगफुटी होऊन पूर आला होता.अमरनाथमधील ढगफुटीनंतर आतापर्यंत १६ नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. तर ४१ नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. ९८ जण जखमी झालेत तर ९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर जखमी लोकांना एअरलिफ्ट करत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. अचानक ढगफुटी होऊन पूर आल्याने अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती . त्यामुळे यात्रेकरु अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु होण्याची वाट पाहत होते.

दोन वर्षानंतर अमरनाथ यात्रा होत आहे. कोरोनामुळे दोन वर्ष अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. आता स्थगित यात्रा पुन्हा सुरु झाल्याने यात्रेकरुंमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यात्रेकरुंनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, ”आम्ही ऊर्जेने भरलेलो आहोत आणि बाबांच्या दर्शनायाशिवाय परत जाणार नाही यात्रा पुन्हा सुरु झाल्याचा आम्हला आंनद आहे.

Amarnath Yatra | अमरनाथ यात्रेला पुन्हा सुरुवात | Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.