Wed. Jun 26th, 2019

एलेक्साशी तुमचा संवाद ‘कुणीतरी’ ऐकतंय!

0Shares

टेक्नॉलॉजीच्या जगात नवनवीन तंत्रज्ञानाची भर पडत असते. गाणं ऐकण्यासाठी  प्रचलित असणाऱ्या ‘Alexa’चा वापर वाढत आहे. याच व्हॉईस कमांड स्पिकरमध्ये सुधारणा करण्यासाठी सध्या अॅमेझॉनचे कर्मचारी ग्राहकांचे संभाषण ऐकत आहेत. त्यासाठी एका दिवसाच्या शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांना तब्बल एक हजार ऑडिओ क्लिप ऐकावे लागत आहे. उत्पादनाच्या अनुषंगाने सुधारणा करता यावी, या उद्देशाने हे संभाषण ऐकले जात असल्याचे अॅमेझॉनकडून सांगितले जात आहे.

तांत्रिक पडताळणीसाठी रेकॉर्डींग सुरू

अॅमेझॉनच्या व्हॉईस कमांड स्पिकरची सध्या क्रेझ सगळ्या जगभरामध्ये आहे.

नवनव्या  टेक्नॉलॉजीने माणसाच्या राहणीमानामध्ये जास्तीत जास्त सहजता येत असते.

या टेक्नॉलॉजीमध्ये सुधारणा करता यावी, यासाठी अॅमेझॉनकडून सध्या एलेक्सा या व्हॉईस कमांड स्पिकरची पडताळणी चालू आहे.

हे करण्यासाठी चक्क या स्पिकरचा वापर करणाऱ्या ग्राहकांचे संभाषण ऐकण्याचे काम अॅमेझॉनने त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिले आहे.

अमेरिका, बोस्टन, कॉस्टारिका, रोमानियातील कर्मचाऱ्यांना हे काम सोपवण्यात आले आहेत.

व्हॉईस रेकॉर्डींगमध्ये सुधारणा होण्यासाठी यावर भर देण्यात येत आहे. अॅमेझॉन इकोची 2014 मध्ये लॉंचिंग करण्यात आले होते.

गेल्या वर्षी जवळपास 7 कोटी ग्राहकांनी एलेक्साची खरेदी केला आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: