Sat. Jun 12th, 2021

बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक फ्लॉप चित्रपटांमध्ये ‘कुली नंबर १’ या चित्रपटाचा समावेश

नामांकित स्टार कास्ट असतानाही ‘कुली नंबर १’ ठरला फ्लॉप…

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खानचा यांचा नुकताचं ‘कुली नंबर १’ हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला. गेल्या वर्षभर या चित्रपटाची फार चर्चा होती. मात्र हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला आहे. नामांकित स्टार कास्ट असतानाही हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर वरुण धवन आणि सारा अली यांना नेटकरी ट्रोल करतचं आहे. शिवाय अ‍ॅमेझोन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मला देखील ट्रोल केलं आहे.

या चित्रपटाची गणना बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वाधिक फ्लॉप चित्रपटांमध्ये केली जात आहे. गेल्या काही काळात फ्लॉप बॉलिवूड चित्रपटांमुळे अ‍ॅमेझॉन प्राईमची लोकप्रियता हळहळू कमी होऊ लागली आहे. त्यातच कंपनीच्या भारतीय अधिकाऱ्यांनी ‘दुर्गामती’ आणि ‘कुली नंबर १’ या चित्रपटांचे हक्क कोट्यवधी रुपयांना खरेदी केले. परिणामी संतापलेल्या मॅनेजमेंटनं या चित्रपटाचे हक्क कोणाच्या सांगण्यावरुन खरेदी केले? याची चौकशी करत आहे. प्रेक्षक अक्षरश: या चित्रपटांची खिल्ली उडवतांना दिसत आहे.

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार अशा फ्लॉप चित्रपटांचे हक्क यापुढे अ‍ॅमेझॉन खरेदी करणार नाही. या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला उत्तम कॉन्टेट पाहायला मिळेल याबद्दल दक्षता घेतली जाईल असं आश्वासन अ‍ॅमेझॉन प्राईमच्या प्रवक्त्यांनी दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *