Thu. Jun 20th, 2019

ई- विक्री क्षेत्रात अॅमेझॅान अव्वल; कॅन्टर संस्थेची माहिती

0Shares

ई-विक्रीच्या क्षेत्रात पुन्हा एकदा अॅमेझॉन कंपनीने बाजी मारली आहे. अॅपल, गुगल या नावाजलेल्या कंपनींना मागे टाकत अॅमेझॉन कंपनीचे सर्वाधिक खप झाल्याची माहिती कॅन्टर संस्थेने प्रसिद्ध केली आहे. अॅमेझॉनसह अॅपल दुसऱ्या आणि गुगल तिसऱ्या स्थानावर आहे.

अॅमेझॉन सर्वाधिक खप –

ई-विक्री कंपन्यांचे मूल्यांकन करणाऱ्या कॅन्टर या संस्थेने अहवाल प्रसिद्ध केला आहे.

यामध्ये 100 कंपन्यांची खप आणि ब्रॅन्ड मूल्यांकनाचा विचार केला जातो.

अॅमेझॉन कंपनीने यामध्ये बाजी मारली असून अॅपल दुसऱ्या आणि गुगल तिसऱ्या स्थानावर आहे.

अॅमेझॉनचे ब्रॅन्ड मूल्य 52 टक्क्यांनी वाढले असून 315 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचले आहे.

अॅमेझॉनने जागतिक बाजारात गुगलला मागे टाकले असून अव्वल कंपनी म्हणून बहुमान पटकवला आहे.

त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट चौथ्या स्थानावर पोहोचले आहे.

ऑनलाईन पुस्तक विक्रीपासून सुरू झालेल्या कंपनीने पहिले स्थान गाठले आहे.

या ऑनलाईन कंपनीने ई-विक्री क्षेत्रात कमी वेळात चांगले नाव बनवले आहे.

 

 

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: