Tue. Jan 18th, 2022

आता Swiggy, Zomato ला टक्कर Amazon ची!

हल्ली जेवण ऑर्डर करण्यासाठी वापरला जाणारा सर्वांत सोपा आणि लोकप्रिय मार्ग म्हणजे Foo Delivery Appsचा. या apps वरून आपण जेवण मागवण्याचं प्रमाण मोठ्या शहरांमध्ये खूप आहे. Swiggy, Zomato, UberEats यांसारखे पर्याय उपलब्ध असतात. यांतील UberEats ला Zomato ने विकत घेतल्यामुळे या क्षेत्रातील एक स्पर्धा कमी जाली होती. मात्र आता E-Commerce क्षेत्रातलं एक अग्रगण्य नाव या क्षेत्रात येत आहे. Amazon आता भारतीय बाजारात फूड डिलिव्हरीच्या उद्योगत हात पाय पसरणार आहे. या महिन्याच्या शेवटापर्यंत Amazon या क्षेत्रात उतरणार आहे. Amazon ने कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे यासाठी सुरूवातही केली आहे.

या प्रोजेक्टसाठी वेगवेगळ्या रेस्टोरंट्सशी जोडलं जाण्याचा प्रयत्न Amazon तर्फे होत आहे. यासाठी Amazon चे संस्थापक जेफ बेजोस यांनी Infosys कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांचं व्हेंचर असणाऱ्या कॅटामरानसोबत डील करत आहेत.

Amazon यासाठी 2 तासांत फूड डिलिव्हरी करणाऱ्या सप्लाय चेनची सहाय्यता घेणार आहे. Zomato आणि Swiggy ही या क्षेत्रातील महत्त्वाची नावं आहेत. त्यामुळे Amazon ला ही सुस्थापित नावं मोठी स्पर्धा ठरू शकतात. याचाच विचार करून Amazon ही नवी सेव सुरू करताना विविध डिस्काऊंट्स, किंवा फ्री फूड यांसारख्या योजना राबवण्याच्या बेतात आहे. सुरुवातीला Amazon Prime वापरणाऱ्यांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यानंतर हळूहळू देशभरात त्यांचं नेटवर्क मोठं करण्याची Amazon ची योजना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *