Sat. Jun 19th, 2021

अंबानी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन

AAKASH AND SHLOKA AMBANI BLESSED WITH SON

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई: अंबानी कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे अंबानी आणि मेहता कुटुंबात आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आजोबा झाले आहेत. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि पत्नी श्लोका यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे.

आकाश अंबानी आणि श्लोका २०१९ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. या दोघांचा शाही विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला होता. सोशल मिडीयावरही यांच्या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा होती. या लग्नाला सिनेसृष्टीपासून, क्रिडा जगतामधील बड्या नावांबरोबरच उद्योग श्रेत्रातील दिग्गजांचाही समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *