Thu. Sep 29th, 2022

अंबरनाथमधील ब्रिटीशकालीन धरणाला तडे; संपूर्ण शहरालाच धोका

जय महाराष्ट्र न्यूज, अंबरनाथ

 

अंबरनाथ येथील जीआयपी धरणाच्या भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेलेत. या तडे गेलेल्या धरणातून पाणी गळती होत असल्याने अंबरनाथ शहराला धोका निर्माण

झाला आहे.

 

हा प्रकार मागील वर्षी प्रसारमाध्यमांनी उजेडात आणल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने कोणतीच कार्यवाही न केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

 

तर, रेल्वेने या धरणाची दुरुस्ती केली असून आता कोणताही धोका नसल्याचे स्पष्टीकरण देऊन रेल्वेच्या कामचुकार अधिकाऱ्यांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न होताना

दिसत आहे.

 

रेल्वेने या धरणाकडे वेळीच लक्ष न दिल्यास अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरासोबतच अनेक परिसरांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

ग्रेट इंडियन पेनिनसुलाने रेल्वेच्या अखत्यारित येणाऱ्या कल्याण रेल्वे स्थानकाच्या निर्मितीवेळी अंबरनाथ येथे धरण बांधण्यात आले होते.

 

दरम्यान, या संदर्भात कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही लोकसभेत सदर धरण दुरुस्तीचा मुद्दा उचलून धरला होता. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली आणि

प्रत्यक्ष परिस्थिती केंद्र शासनास त्यांच्या लक्षात आणून दिली.

 

यावर त्यांनी ही तातडीने उपाययोजना करण्याचं आश्वासन दिले आहे. मात्र, याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर मोठी दुर्घटना होऊ शकते असे मत नागरिकांनी व्यक्त

केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.