Mon. Aug 15th, 2022

युक्रेनच्या राजदूतांचे भारताच्या पंतप्रधानांना आवाहन

रशियाने युक्रेनच्या राजधानीसह अन्य शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. तर युक्रेनने रशियाला जशास तसे उत्तर दिले आहे. युक्रेनने रशियाची सहा विमाने आणि एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे. त्यामळे रशिया-युक्रेनच्या लष्करांमध्ये युद्ध सुरू आहे. अशातच, युक्रेनच्या राजदूतांकडून भारताच्या पंतप्रधानांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या तणाग्रस्त युद्धात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी युक्रेनच्या राजदूताने केली आहे. भारतातील युक्रेनच्या राजदूताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीचे आवाहन केले आहे. भारताचे रशियासोबच चांगले संबंध आहेत. त्यामुळे रशिया-युक्रेन परिस्थिती आणखी बिघडण्यापूर्वी भारत या तणावात हस्तक्षेप करून महत्वाची भूमिका बजावू शकतो, असे भारतातील युक्रेनच्या राजदूतचे म्हणणे आहे. राजदूतांनी आवाहन केले की, भारत हा जगातील अत्यंत प्रभावशाली देश आहे. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी तात्काळ बोलावे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.