Jaimaharashtra news

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अंबाती रायडूची निवृत्ती !

भारतीय संघाचा मधल्या फळीचा फलंदाज आणि अनुभवी क्रिकेटपटू अंबाती रायडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय बुधवारी घेतला. त्याच्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 2015 आणि 2019 च्या  वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची संधी न मिळाल्याने आता पुढचा  वर्ल्ड कपही खेळता येणार नसल्यानं रायडूनं त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितले जात आहे.

रायुडूसोबत नेमकं घडलं तरी काय?

वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यासाठी अंबाती रायडूची जोरदार चर्चा चालू होती.

शिखर धवन आणि विजय शंकर यांना दुखापतीमुळे संघातून बाहेर पडावे लागले.

त्यानंतरदेखील पर्यायी खेळाडू म्हणून रायडूच्या नावाचा विचार करण्यात आला नाही.

त्यांच्या जागी मयंक अग्रवाल व ऋषभ पंत यांचा समावेश करण्यात आला.

याच गोष्टीमुळे नाराज झालेल्या रायडूनं BCCI ला मेल पाठवत आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

अंबाती रायडूची क्रिकेटविश्वातील कामगिरी

33 वर्षाय रायडूनं  55 वन डे सामन्यांत 1694 धावा केल्या आहेत.

यांमध्ये १० अर्धशतकांचा समावेश आहे.

६ टी-२० सामन्यांत त्याने ४२ धावा केल्या आहेत.

यावेळी रायडू आयपीएल मधून चेन्नई सुपर किंग्सच्या बाजूने खेळला होता.

147 आयपीएल सामन्यांत त्याने एकूण ३३०० धावा केल्या आहेत.

 

कोणत्या देशान दिली अंबातीला पुन्हा खेळण्याची ऑफर?

अंबाती रायडूला आईसलॅंड संघाकडून खेळण्याची ऑफर देण्यात आली आहे.

”अंबाती रायुडूनं त्याचे 3D ग्लास आता तरी बाजूला ठेवायला हवे. आम्ही तयार केलेले कागदपत्रं वाचण्यासाठी त्याला साधारण चष्माही पुरेसा आहे. आमच्या संघाकडून खेळ,”

असे ट्विट आईसलॅंड क्रिकेट टिमने केलं आहे.

 

 

 

 

Exit mobile version