Fri. Oct 22nd, 2021

रायगड आणि रत्नागिरीला जोडणारा आंबेत पूल पुन्हा वाहतुकीसाठी सुरू

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा आंबेत पूल सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता . सावित्री नदी दुर्घटनेनंतर आंबेत पुलाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी फेरीबोट सेवा सुरू करण्यात आली होती . हा पूल बंद केल्यामुळे दापोली, मंडणगड, वेळास, बाणकोट, आंजर्ले, मुरूड, दाभोळ इथे जाणाऱ्या प्रवाशांना, चाकरमान्यांना डोकेदुखी झालेली . हा पूल नादुरूस्त झाल्यामुळे यावरची अवजड वाहनांची वाहतूक याआधीच बंद करण्यात आली होती.

कमकुवत झाल्याने दुरुस्ती कामासाठी दोन वर्षे बंद ठेवण्यात आलेला हा पूल आज २७ जून रोजी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. आज सकाळी राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुलाचे दुरुस्तीनंतर लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर पुलावरून वाहतूक सोडण्यात आली. पूल चालू झाल्याने दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून मंडणगड, दापोली तालुक्यातील नागरिक, प्रवाशांची होणारी गैरसोय दूर झाली असून अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *