Mon. May 17th, 2021

भारताच्या कारवाईला अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचं समर्थन

भारताचे एनएसए अजित डोबाल यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांच्याशी दूरध्वनीवरून बातचीत केली आहे. भारताने पाकिस्तानात घुसून जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या हल्ल्याबाबत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांनी समर्थन दर्शवले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन्ही सैन्य दलांशी बातचीत केली. यावेळी हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचेही मोदींना सांगण्यात आले आहे. तीन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

भारत- पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण असून हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. भारतात त्यांना सुरक्षित परत करावे अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच दुसरीकडे काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टर येथे पाकिस्तान सैन्य आणि भारतीय जवानांमध्ये गोळीबार सुरू झाला होता. मात्र सुरक्षा दलाने त्यांनाही चोख प्रत्युत्तर दिले आहे.

माईक पोम्पिओ काय म्हणाले ?

पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून जैशच्या तळांना उद्धवस्त केले.

भारताने केलेल्या कारवाईबद्दल अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सनेही समर्थन केले आहे.

पाकिस्तानमध्ये सक्रिय दहशतवादी तळांचा खात्मा करण्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी सांगितले होते.

तसेच जर दोन्ही देशांमध्ये शांतता हवी असेल तर दहशतवादी तळांचा खात्मा करावाच लागेल असेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

तसेच मी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्याशी बातचीत केली.

त्यांना मी सध्याची परिस्थिती गंभीर नका करू असा सल्लाही दिला आहे.

कुरेशी म्हणाले, आम्ही पाकिस्तानला सांगितले आहे की सध्याची परिस्थिती गंभीर असल्यामुळे संयमाने रहावे.

तसेच पाकिस्तांनी सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटन्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *