Tue. Jan 18th, 2022

… म्हणूनच आमिर शाहरूखच्या घरी जेवला नाही

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेला अभिनेता आमिर खान नेहमी आपल्या भूमिकेबाबत चोखंदळ असतो. मात्र आमिर चक्क स्वत:चा डब्बा सगळीकडे घेऊन जात असल्याचा खुलासा त्याने केला आहे. याबद्दलचा एक गंमतीशीर किस्सा त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने दंगल सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान घडलेली आठवण सांगितली आहे. यावरुन तो त्याच्या डाएट विषयी किती परफेक्ट आहे, हे त्याने पुन्हा दाखवून दिलंय.

काय आहे गंमतीशीर किस्सा ?

बॉलिवूडमध्ये सिनेकलाकार त्यांच्या कामाला किती डेडीकेशन देतात, हे काही वेगळं सांगायला नको.

याचं परफेक्ट उदाहरण म्हणजे अभिनेता आमिर खान.

आमिरने आत्तापर्यंत प्रत्येक भूमिकेला त्याच्या प्रमाणे परफेक्ट करतो.

‘दंगल’ सिनेमासाठी आमिरला वजन वाढवण्याची गरज होती. त्यासाठी तो डाएट करत असल्याचे त्याने सांगितले.

मात्र हे करताना त्याला आलेला अनुभव त्याने शेअर केला. एका पत्रकार परिषदेत त्याने त्याचा मजेशीर किस्सा सांगितला आहे.

एकदा तो शाहरूख खानच्या घरी गेला असताना शाबरूखची बायको गौरी खानने आमिरला जेवणासाठी विचारले.

यावेळी आमिरने तिला ‘मी डब्बा आणला आहे. तेच जेवणार असे उत्तर दिले’.

या गोष्टीमुळे शाहरूख आणि त्याच्या कुटुंबाला आश्चर्य वाटले.

असाच काहीसा परफेक्ट रोल घेऊन आमिर आगामी चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे.

प्रसिद्ध हॉलिवूडचा चित्रपट ‘फॉरेस्ट’ याचा रिमेक असणारा ‘लाल सिंग चढ्ढा’ या सिनेमामध्ये तो मुख्य भूमिकेत असणार आहे.

 

View this post on Instagram

 

Aamir, bugün Mumbai’de kendisine Dangal için düzenli kilo vermesine yardımcı olan Doktor Nikhil Dhurandhar’ın Fat Loss Diet kitabının lasmanınaydı. Aamir lasmanda doktorun kitabından ve Dangal için dönüşümünü anlattı. Ayrıca kitabın ön sözünü Aamir yazdı. ____________________ Haber çevirisi sayfamıza aittir. Lütfen etiket yaparak kullanın!! Follow 👉 @iaamirkhanx #aamirkhan #followforfollow #dangal #anushkasharma #bollywood #ranveersingh #imrankhan #dishapatani #parineetichopra #varundhawan #shahidkapoor #sonamkapoor #salmankhan #shahrukhkhan #sidharthmalhotra #aliaabhatt #shraddhakapoor #katrinakaif #jacquelinefernandez #kareenakapoor #deepikapadukone #mawrahocane #priyankachopra #ileanadcruz #adityaroykapoor #akshaykumar #hrithikroshan #aishwaryarai

A post shared by Aamir Khan Fan Turkey-turkish (@iaamirkhanx) on

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *