Fri. Sep 30th, 2022

दहशतवादाबद्दल विचारल्यावर आमीरने ‘हे’ उत्तर दिले

बॉलिवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेले आमीर खान यांचा आज ५४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आमिर खान यांनी पत्रकारांसोबत अनेक विषयांवर बातचीत केली आणि केकही कापला. तसेच यावेळी आमीर खानने त्याच्या आगामी चित्रपटाचीही घोषणा केली. त्याचबरोबर आमीरने अनेक घडामोडींवर चर्चाही केली.

आमीर खानची पत्रकार परिषद –

आमीर खान यांनी आज ५४ वा वाढदिवस साजरा केला.

यावेळी त्याने पत्रकारांसोबत संवाद साधला आणि केकही कापला.

आमीर खानने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली.

लालसिंग चढ्ढा असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव असून अद्वैत चंदन यांनी दिग्दर्शन केले आहे.

त्याचबरोबर यावेळी आमीर खान यांची पत्नी किरण रावही उपस्थित होते.

आमीर खानला दहशतवादावर पश्न विचारल्यावर त्याने त्यावर बोलणं टाळलं तसेच त्यावर आजच्या दिवशी नको बोलायला असंही म्हटलं.

तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करावे असेही आमीरने सांगितले.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.