Wed. May 22nd, 2019

अमिर खानची बहीण येतेय ‘या’ सिनेमातून प्रेक्षकांसमोर

0Shares

सुपरस्टार अमिर खान याची बहीण निखत खानदेखील आता Bollywood मध्ये पदार्पण करत आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्या आगामी ‘सांड की आँख’ या सिनेमातून निखत खान प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यापूर्वी अमिर खान याचा भाऊ फैजल खान आणि भाचा इम्रान खान यांनीही Bollywood मध्ये नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दोघांनाही फारसं यश मिळालं नव्हतं.

‘सांड की आँख’ या सिनेमात भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दोघी नेमबाजी करणाऱ्या म्हाताऱ्या महिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. याच सिनेमामध्ये अमिर खान याची बहीण निखत खान एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. निखत खान एका महाराणीची भूमिका करणार आहे.

निखत हिने पूर्वी ‘तुम मेरे हो’ या सिनेमाची निर्मिती केली होती.

तसंच 2002 साली ‘हम किसीसे कम नही’ या सिनेमाची कॉश्चुम असिस्टंट म्हणूनही तिने काम केलं होतं.

मात्र प्रथमच ती अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *