बिग बींचे ट्विटर अकाऊंट हॅक; अकाऊंट पुन्हा पूर्ववत

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे. अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करून त्यांचा प्रोफाईल फोटो काढून पतंप्रधान इम्रान खान यांचा फोटो ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर हॅकर्सने बायोची माहिती बदलून लव पाकिस्तान असे लिहिण्यात आले होते.
नेमकं काय घडलं ?
बिग बींचे सोमवारी रात्री ट्विटर अकाऊंट हॅक झाले.
हॅकर्सने अमिताभ बच्चन यांचा प्रोफाईल फोटो काढून पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो ठेवला.
बिग बींच्या ट्विटर अकाऊंटवरील बायोची माहिती बदलून लव पाकिस्तान असे लिहिण्यात आले.
मात्र अकाऊंट पुन्हा पूर्ववत झाल्याचे समजते आहे.
बिग बींनी दोन ट्विट केले आहे.
एक ट्विट तुर्कीश फुटबॉल टीमला समर्थन देणारे होते.
दुसरे भारतातील मुसलमान समाजाबाबत होते.
त्यामुळे हे अकाऊंट तुर्कीश हॅकर्सने हॅक केल्याचे समजते आहे.
अकाऊंट हॅक झाल्याची माहिती मिळताच बिग बींनी मुंबई पोलिसांच्या सायबर यूनिटला माहिती दिली.