Sat. Jul 11th, 2020

अबू आझमींचं डोकं उडवणाऱ्याला 5 लाख, अमित भारद्वाजची धमकी

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

वंदे मातरमचा वाद काही संपताना दिसत नाही. वंदे मातरम बोलण्यासाठी नकार देणाऱ्या अबू आझमींना वारंवार धमकी मिळताना दिसत आहे. हिंदू स्वाभिमान संस्थेचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा करणाऱ्या अमित भारद्वाज यानं आझमींना वादग्रस्त धमकी दिली.

 

अबू आझमींचं डोकं उडवून ते इंडिया गेटवर लटकवणाऱ्याला 5 लाखांचं इनाम अमित भारद्वाजनं जाहीर केलं. वंदे मातरम न म्हणणाऱ्या अबू आझमींचं डोकं उडवणार अशी धमकी त्यानं दिली.

 

अबू आझमी यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही यासंदर्भात चिंता व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी बाचतीत केली. 48 तासांत धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *