Sun. Jun 20th, 2021

‘एमबीबीएसच्या परीक्षा जूनमध्ये होणार’

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक महत्वाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या, तर काही परीक्षा रद्दच करण्यात आल्या. एमबीबीएसच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या ज्या परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या होत्या त्या जूनच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

‘एमडीची परीक्षा आम्ही घेतली आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या’, असेही देशमुख म्हणाले.

‘महाराष्ट्रात हळूहळू कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत आहे. त्याचप्रमाणे नागपुरातसुद्धा स्थिती हळूहळू सुधारत असल्याचं देशमुख यांनी सांगितलं. राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर लसीकरणासाठी तयारी सुरू केली आहे, परदेशातून लस आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न आहेत. लोकांनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. हे कोरोना विरोधातल्या लढाईत महत्वाचे आहे असे अमित देशमुख म्हणाले.

 

संपादन: सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *