Sun. Jun 13th, 2021

अमित शहांनी दाखवले भाजपला अच्छे दिन

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

अमित शहा यांना भाजप अध्यक्षपदावर येऊन तीन वर्ष पुर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे या गुजरातमधील आमदारांनी शहांना राज्यसभेत पाठवून आजच्याच दिवशी विशेष

भेट दिली.

 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून काम करताना एनडीएला 73 जागी विजय मिळवून दिल्यानंतर अमित शहा चर्चेत आले.

 

या विजयामुळेच मोदींचा पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास सोपा झाला. त्यानंतर नरेंद्र मोदींनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा अमित शहा यांच्याकडे सोपवली.

 

पक्षाध्यक्ष म्हणून काम करताना शहांनी पक्षाला विजयाच्या एका नव्या वळणावर नेऊन ठेवले आणि भाजपलाही अच्छे दिन दाखवलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *