Sun. Sep 22nd, 2019

जवाहरलाल नेहरुंमुळे पाकव्याप्त काश्मीर निर्माण झाला – अमित शहा

0Shares

कलम 370 हटवण्याला फारसा विरोध नाही. व्होट बँकेसाठी अनेक पक्ष विरोध करत आहेत. पंतप्रधानांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवली. त्यांनी दाखवलेल्या दृढ निश्चयामुळे हा निर्णय झाल्याचं सांगत गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत विरोधकांना आक्रमकपणे उत्तर दिलं. परिस्थिती सामान्य झाल्यास जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देणार असल्याचं अमित शहा म्हणाले. संसदेला जम्मू आणि काश्मीर संदर्भात कायदे करण्याचा पूर्ण अधिकार असतील, असं अमित शहा यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले अमित शहा?-

पाकिस्तान शरण आल्यावर एकतर्फी शस्त्रसंधी केली. जवाहरलाल नेहरुमुळे पाकव्याप्त काश्मीर निर्माण झाला

पाकिस्तान शरण आल्यावर एकतर्फी शस्त्रसंधी केली. जवाहरलाल नेहरुंमुळे पाकव्याप्त काश्मीर निर्माण झाला

जवाहरलाल नेहरुंनी काश्मीरचा प्रश्न UNO मध्ये नेला

या निर्णयामुळे नरेंद्र मोदींना इतिहासात स्थान मिळणार

कलम 371 देशाच्या एकता, अखंडेला बाधा पोहोचवत नाही

जम्मू-काश्मीरमध्ये अटक, संचारबंदी नेहमीच्या घटना

यापुर्वी कित्येक वर्षे कर्फ्यू सुरु होता

परिस्थिती चिघळायला नको म्हणून संचारबंदी लागू केली

हुर्रियत सोबत कुठल्याही परिस्थितीत चर्चा करणार नाही

काश्मीर खोऱ्यातील जनतेशी चर्चा करणार

काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात

काश्मीर खोऱ्यातील जनतेशी संवाद साधणार

जम्मू-काश्मीर देशात सर्वात महत्वाचं राज्य आहे

आतापर्यंत 41000 लोकांचे प्राण गेले

कलम 370 चा वापर करुन पाकिस्तानने तरुणांची माथी भडकवली

विधानसभेला नाकारुन तूम्ही आंध्रप्रदेशचे दोन तुकडे केले

मुख्यमंत्र्यांचा राजीनामा देऊनही काँग्रेसने विभाजन केलं

इमर्जंसी लावतांना काँग्रेसने सर्व कायदे पायदळी तुडवले

जम्मू-काश्मीरला पुर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी 70 वर्षे घालवणार नाही

1965 मध्ये पाकिस्तानने भारताची सीमा ओलांडली

त्यावेळी सार्वमताचा प्रश्न निकाली लागला

जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू, शिख,मुस्लीम, बौद्ध राहतात

त्यामुळे कलम 370 धार्मिक अजेंडा नाही

आजपर्यंत 41000 लोक काश्मीरमध्ये मारले गेले

देशाने आताही याच मार्गावरुन चालायचं का?

ऐतिहासिक चुकीची आम्ही दुरुस्ती करतोय.

मोदींच्या नेतृत्वात जम्मू-काश्मीरचा विकास होणार

मला लोहपुरुष बनायचं नाही. मी भाजपचा साधा कार्यकर्ता आहे

देशाच्या फायद्यासाठी, सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला गेलाय, व्यक्तीगत फायद्यासाठी नाही

कलम 370 मुळे जम्मू-काश्मीरचं काय भलं झालं हे कुठल्याही सदस्यांनी सांगितलं नाही

कलम 370 मुळे जम्मू-काश्मीरमध्ये गरीबी,बेरोजगारी वाढली

या कलमामुळे दहशतवाद फोफावला. केवळ तीन परिवारासाठीच हे कलम फायद्याचं

जम्मू काश्मीरमध्ये बालविवाह अजूनही सुरुच आहे. हा कुठल्या जमान्यातला कायदा आहे?

काश्मीरमध्ये अल्पसंख्याक आयोग अस्तित्वात नाही

शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा काश्मीरमध्ये लागू नाही

जम्मू-काश्मीरमध्ये देशातील अनेक महत्वाचे कायदे लागू होत नाही. मग जनतेचा विकास कसा होणार?

कलम 370 मुळे काश्मीर खोऱ्याचं किती नुकसान झालं

याचा अभ्यास विरोधकांनी कधी केला नाही

जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना नाही. आता हे चालणार नाही

जम्मू-काश्मीरात आता भ्रष्ट्राचाराची चौकशी सुरु झालीये

त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील अनेक नेत्यांना घाम फुटलाय. त्यामुळे कलम 370 ला विरोध होतोय.

कलम 370 मुळे काश्मीर खोऱ्यात राजकीय आरक्षण लागू नाही

कोट्यवधीचा निधी केंद्राने जम्मू-काश्मीरला पाठवला

मात्र हा पैसा भ्रष्ट्राचाराच्या गंगेत वाहून गेला

जम्मू-काश्मीरच्या जनतेला कुठलाच फायदा मिळाला नाही

जम्मू-काश्मीरबाहेर लग्न केल्यास महिलांना संपत्तीचा अधिकार गमावावा लागायचा.

मात्र आम्ही या मुलींना त्यांचा अधिकार देणार.

कलम 370 मुळे जम्मू-काश्मीरला गरीबी शिवाय काही मिळालं नाही

केवळ तीन कुटुंबांना फायदा मिळाला.

कलम 370 मुळे तरुणांचा काय फायदा झाला?

कलम 370 चा फायदा पाकिस्तानने उचलला.

काश्मीरच्या तरुणांची माथी भडकवली. खोऱ्यात दहशतवाद भडका उडाला.

इंदरकुमार गुजराल, मनमोहन सिंह हे भारतात निर्वासित म्हणून आले

ते जम्मू-काश्मीरध्ये गेले नाही

अन्यथा दोघेही पंतप्रधान होऊ शकले नसते

काश्मिरी पंडीत, सुफींना काश्मीर खोऱ्यातून बाहेर काढलं, त्यांचा मानवाधिकाराची कुणालाचं पडलेली नाही

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *