Mon. Dec 16th, 2019

भाजप अध्यक्ष अमित शाह होणार देशाचे नवे संरक्षणमंत्री ?

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भाजप अध्यक्ष अमित शाह हे देशाचे नवे संरक्षणमंत्री होण्याची शक्यता आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर मोंदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चिन्हं

आहे.

 

या मंत्रिमंडळात अमित शाह यांच्याकडे संरक्षण मंत्रीपद देण्याचे संकेत आहेत. सध्या अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडेच संरक्षण मंत्रीपदाचा भार आहे.

 

अमित शाह हे गुजरातमधून राज्यसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या निवडणूक लढवण्याचं कारण हेच असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

 

याशिवाय नुकतंच बिहारमध्ये एनडीएच्या साथीला आलेले नितीश कुमार, यांच्या जेडीयूलाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *