गृहमंत्रालय २४ तास सुरू ठेवण्याचे अमित शहा यांचे आदेश

कोरोनामुळे देशावर मोठं संकट कोसळलं आहे. त्याचा संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात् आलेल्या लॉकडाऊनचा कालावधीही वाढवावा लागला आहे. विविध ठिकाणी लोकप्रतिनिधी दिवसरात्र काम करून कोरोनापासून जनतेला मुक्त करण्यासाठी धटत आहेत. आरोग्य सेवा पुरवणारे कर्मचारी तसंच पोलीस कर्मचारी प्राण संकटात टाकून कर्तव्य बजावत आहेत. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी गृहमंत्रालय २४ तास सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  

लॉकडाऊनच्या काळात कुणीही विनाकारण बाहेर पडू नये, यासाठी पोलीस आता लोकांवर लक्ष ठेवून आहेत. कुणीही नियमभंगाचा प्रयत्न करू नये, असं आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येतंय. लॉकडाऊन संबंधी अनेक निर्णयही घेतले जात आहेत. त्यामुळेच गृहमंत्री अमित शहा यांनी गृहमंत्रालय दिवस रात्र २४ तास सुरू ठेवण्याचा आदेश दिला आहे.

Exit mobile version