Fri. Jun 21st, 2019

45 जागा जिंकून द्या, अमित शाह यांचं आवाहन

215Shares

पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुखांना लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी अमित शाह यांचे शिवसेनेशी युतीसंदर्भातील संकेतही दले. 45 जागा जिंकून देण्याचं आवाहनही त्यांनी NDA ला यावेळी केलं.

“अन्य पक्षांपेक्षा भाजप श्रेष्ठ आहे”

 • लोकसभा निवडणुकीत विरोधक सत्तेवर आल्यास आपण कित्येक वर्ष मागे जाऊ.
 • निवडून आल्यास काँग्रेसवाले जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम करतील.
 • महाआघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे.
 • आमच्या सरकारने पारदर्शक कारभार करीत भ्रष्ट्राचार नष्ट केला आहे.
 • शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी खरेदी केलेल्या अन्नधान्याची आकडेवारी द्यावी
 • राहुलबाबा आणि शरद पवार कितीही ओरडू द्या घुसखोरांना हाकलून लावू.
 • आम्ही घराणेशाहीला संपवलंय
 • जातीवादाचं राजकारण करणाऱ्या पक्षांना आम्ही मागे टाकलंय.
 • अन्य पक्षांपेक्षा भाजप श्रेष्ठ आहे.

  “काँग्रेसचं OROP म्हणजे ONLY RAHUL ONLY PRIYANKA”

 • सत्तर वर्षांपासून देशाचे जवान एक रँक एक पेन्शन मागत होते… आम्ही त्यांना दिलंय
 • आमचं OROP म्हणजे ONE RANK ONE PENSION आहे, आणि काँग्रेसचं OROP म्हणजे ONLY RAHUL ONLY PRIYANKA आहे.
 • आम्हाला विरोधक विचारतात सहा हजारांनी काय होणार… तुमच्या सरकारनं कय केलं त्याचा आधी हिशेब द्या
 • आम्ही शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणल्या
 • आम्ही विकास तळागाळापर्यंत पोहोचवला. देशातल्या सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आम्ही सादर केला.
 • 55 वर्ष एका कुटूंबानं देशावर राज्य केलंय. हा खूप मोठा काळ आहे.
 • मोदींनी 55 महिने देश चालवला.
 • 55 वर्षांत जे झालं नाही ते मोदींनी 55 महिन्यांत करुन दाखवलं.

“आगामी लोकसभा निवडणूक देशाचं भविष्य ठरवणारी”  

 • ही निवडणूक जातीवादाला नाकारून विकास करणाऱ्या नेतृत्वाला पुढे नेणारी ठरणार आहे.
 • उत्तर प्रदेशात आम्ही ७३ ऐवजी ७४ जागा जिंकू पण ७२ होऊ देणार नाही.
 • मला महाराष्ट्रातून ४५ जागा निवडून दिल्यास घुसखोरांना पळवून लावू.
 • जगात भारत हा महासत्ता म्हणून उभा राहील
 • जो विकास करेल, तोच देश चालवेल हे मोदींनी सिद्ध केलंय.
 • अन्य पक्षांपेक्षा भाजप श्रेष्ठ आहे

आम्ही अयोध्येत राम मंदिर बाधण्यासाठी कटिबद्ध

 • अयोध्येप्रकरणी आम्ही सुप्रीम कोर्टात केस सुरू केली आहे .
 • काँग्रेसला राम मंदिर नको आहे. कारण गेल्या दहा वर्षांत त्यांनी काहीचं केल नाही.
 • शरद पवार आणि अशोक चव्हाण यांनी स्पष्ट करावे की अयोध्येत त्यांना राम मंदिर हवं आहे की नाही?
 • अयोध्येत राम मंदिर होणारच, यात दुमत ठेवू नये.

215Shares

Leave a Reply

%d bloggers like this: