Sun. May 16th, 2021

साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर खोटे गुन्हे – अमित शाह

हिंदू दहशतवादाच्या नावाखाली साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जगात देशाच्या संस्कृतीला बदनाम करण्याचे काम करण्यात आलं आहे.कोर्टात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावरचा खटला खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. असं मत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी कोलकाता येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.अमित शाह यांच्या या विधानामुळे ते साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची पाठराखन करत असल्याचे स्पष्ट होत आहे. मी हेमंत करकरेंना दिलेल्या शापामुळं हेमंत करेकरेंना 26/11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी मारलं.असं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलं होतं.यावर संतप्त प्रतिक्रीया उमटल्या होत्या.

काय म्हणाले अमित शाह?

स्वामी असीमानंद आणि इतर लोकांना खोटे खटले दाखल करुन आरोपी बनवण्यात आले.

हिंदू दहशतवादाच्या नावाखाली साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जगात देशाच्या संस्कृतीला बदनाम करण्याचे काम करण्यात आलं आहे.

परंतु हे खटले खोटे असल्याचे सिद्ध झाले आहेत. असं ही ते म्हणाले.

समझौता एक्स्प्रेसमध्ये स्फोट करणाऱ्या लोकांना अटक करून सोडण्यात आलं आहे.

स्फोट करणारे लोक कुठे आहेत. असा सवाल ही त्यांनी विचारला आहे.

ममता दीदींना आपला पराभव स्पष्ट दिसत आहे.असं म्हणत ममता बॅनर्जींनाही त्यांनी लक्ष केलं.

बंगालमध्ये लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप यावेळी अमित शाह यांनी केला.

मी हेमंत करकरेंना दिलेल्या शापामुळं हेमंत करेकरेंना 26/11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी मारलं.

असं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलं होतं.यावर संतप्त प्रतिक्रीया उमटल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *