Sun. Jun 20th, 2021

बाबासाहेबांप्रमाणेच मोदी वंचितांसाठी काम करत आहेत- अमित शहा

आज सावरगाव येथे भगवानगडावर दसरा साजरा झाला. या उत्सवासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. 360तोफांची सलामी देऊन अमित शहा यांचं स्वागत करण्यात आलं. सभेला पंकजा मुंडे, हरिभाऊ बागडे, राम शिंदे सुभाष देशमुख उपस्थित होते. अमित शहा यांना भगवान बाबा फेटा बांधण्यात आला.

अमित शहा यांनी भाषणात गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती जागवतानाच पंकजा मुंडे यांचं कौतुक केलं. यावेळी ‘पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा’, अशी जोरदार घोषणाबाजी झाली.

काय म्हणाले अमित शहा आपल्या भाषणात?

मी 5 वर्षांपूर्वी भगवान गडावर गेलो होतो

मेहनत करणाऱ्या व्यक्तींना यशाचा मार्ग दाखवण्याचं काम भगवान बाबांनी केलं

गोपीनाथ रावांनी भगवान बाबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समाजहिताची कामं केली

पंकजा मुंडे देखील गोपीनाथजींच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहेत

कलम 370 हटायला हवं होतं की नव्हतं, असा सवाल अमित शहांनी जनतेला केला.

370 हटवण्याचं काम मोदींनी केलं, मोदींनी वंचीत आणि ओबीसी समाजाच्या विकासासाठी काम केलं

ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी वंचितांच्या विकासासाठी काम केलं त्याच पद्धतीने मोदीं काम करत आहेत

पंकजा मुंडे काय म्हणाल्या भाषणात?

आत्तापर्यत अमित शहा यांनी जितकं सीमोल्लंघन केलं, त्यापेक्षा जास्त सीमोल्लंघन भविष्यात होईल

भगवान बाबांचा आशीर्वाद त्यांच्यासोबत आहे.

मी मोदींचा आशीर्वाद घेतलाय. मोदींनी ‘खुश रहा’ असा आशीर्वाद दिलाय

गरिबांना ‘अच्छे दिन’ आणायचे आहेत

आम्ही ऊसतोड कमगारांसाठी काम करतोय

पुढच्या 5 वर्षात त्यांच्या हातातला कोयता बाजूला सारायचा आहे

इथे संपूर्ण राज्यातून लोक आले आहेत

तुम्हाला जे हवं ते मला आवडेल आणि मला आवडणाऱ्या गोष्टी तुम्हाला आवडतील

जे कोणाला वाटलं नव्हतं ते मोदीजी आणि अमित शहांनी साध्य करून दाखवले

मुंडे साहेबांनंतर त्यांची जागा तुम्ही मला दिलीत

तुमच्या पायात माझ्या कातड्याचे जोडे जरी घातले तरी तुमचे उपकार फेडता येणार नाहीत

तुमच्या आशीर्वादामुळे संधीचं सोनं करता आलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *