Tue. Jun 2nd, 2020

मोदींच्या नेतृत्वात भारत महाशक्ती बनेल- अमित शाह

सेंट्रल हॉलमध्ये NDA चे संसदीय अध्यक्ष म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड झाल्यावर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मोदी यांचं स्वागत केलं.

काय म्हणाले अमित शाह?

मी सर्व घटक पक्ष नेत्यांचे आभार मानतो. पंतप्रधानांनी याच सेंट्रल हॉलमधून कामाला सुरुवात केली होती. समाजाच्या सर्व थरातील लोकांसाठी काम केलं. पाच वर्षे पंतप्रधांनानी देशाच्या जनतेची सेवा केली. पुन्हा मोदी पंतप्रधान होत आहेत. जनतेनं मोठी जबाबदारी आपल्याला दिली आहे. अनेक वर्षानंतर दुसऱ्यांदा कुणी बहुमताने सत्तेवर येत आहे. अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. 17 राज्यात 50 टक्यापेक्षा जास्त मत मिळाली आहेत. सर्व देशाने NDAला, BJP ला मतदान केलंय.

मोदींवर लोकांनी विश्वास दाखवला. गरीब घरातला माणूस पंतप्रधान होऊ शकतो. नरेंद्र मोदी नावाचा प्रयोग केला. त्याला जनतेनं भरभरुन प्रतिसाद दिला. मोदींनी जे म्हटलं, ते पूर्ण केलं. सामान्य घरातल्या, कुठलाही राजकीय वारसा नसलेला व्यक्ती आज पुन्हा दुसऱ्यांदा पंतप्रधान होतोय. पाच वर्षांच्या कारभाराला जनतेनं पसंती दिली. 22 कोटी जनतेच्या जीवनात नवी पहाट मोदींनी आणली. गेल्या पाच वर्षात 22 कोटी जनतेचा जीवनस्तर वाढवला.
देशातला दहशतवादाला संपुष्टात आणण्याचं काम मोदींनी केलं. सर्जिकल स्ट्राईकनंतर देशाचं कणखर नेतृत्व पुढं आलं. पुलवामानंतर मोदींनी राजकीय इच्छाशक्ती दाखवली. 1990 नंतर देशाच्या सुरक्षेची उपेक्षा होत होती. जातीयवाद, तुष्टीकरण, परिवारवाद यांना जनतेनं नाकारलं.
देशभरात मोदींची त्सुनामी होती. गेले 20 वर्षे मोदींनी एकही सुट्टी घेतली नाही. 24 तासापैकी 18 तास मोदी काम करतात. अनेक कठोर निर्णय़ मोदींनी घेतले. मात्र केवळ जनतेच्या भल्यासाठी घेतले. जगात भारत महाशक्ती बनायला हवा. दुसऱ्या टर्ममध्ये मोदींच्या नेतृत्वात भारत महाशक्ती बनेल. जगात भारताला योग्य सन्मान मिळेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *