Mon. Jul 22nd, 2019

अमोल कोल्हे उतरणार प्रचाराच्या रिंगणात

105Shares

स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेतील अभिनेते अमोल कोल्हे यांनी नुकताच  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

त्यांच्या पक्षातील प्रवेश आगामी शिरूर लोकसभा निवडणुकीत विजयाची नांदी ठरणार असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरूरमधून ते सर्वोत्कृष्ट उमेदवार मानले जातात.

या पार्श्वभूमीवर भोसरी गावजत्रा मैदानावर उद्या मंगळवारी सायंकाळी 6 वाजता अमोल कोल्हेच्या प्रचाराचा ‘श्रीगणेशा’ होणार आहे.

अशी माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी दिली.

भोसरी गावजत्रा मैदानावर  प्रचाराचा ‘श्रीगणेशा’

पूर्वीचे शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख असलेले अमोल कोल्हे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशाने शिवसेनेला चांगलाच धक्का बसला आहे.

अभिनेते अमोल कोल्हे यांनी नुकताच  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे कर्तुत्व  महत्वाचे ठरेल.अशी चर्चा होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरूरमधून ते सर्वोत्कृष्ट उमेदवार मानले जातात.

भोसरी गावजत्रा मैदानावर उद्या सायंकाळी 6 वाजता अमोल कोल्हेच्या प्रचाराचा ‘श्रीगणेशा’ होईल. ही माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी दिली.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार विलास लांडे इ. मान्यवर उपस्थित राहतील.

या सभेच्या नियोजनासाठी भोसरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकी घेण्यात आल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिरूर लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हेंना मैदानात उतरवणार आहे.

यासाठी शिरूर लोकसभा मतदार संघातील भोसरी, चाकण, खेड, आंबेगाव, राजगुरूनगर, शिरूर आणि हडपसर मध्ये राष्ट्रवादीच्या जाहीर सभा होतील.

 

 

 

105Shares

Leave a Reply

%d bloggers like this: