Tue. Oct 27th, 2020

दुष्काळाची आग पाखड ; पाण्याअभावी चक्क ‘हे’ सापडले

सध्या राज्यात पाणीबाणी सुरू असून अनेक गावांना पाणी संकटाला सामोरे जावे लागत आहे. अमरावतीतही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असून मोर्शीतील अपर वर्धा धरण परिसरही दुष्काळात होरपळतोय. धरण बांधणीच्या वेळी ज्या गावांनी स्थलांतर केले त्या ठिकाणी असलेले मंदिर,विहिरी अशा पुरातन वास्तू सापडल्या आहेत. दुष्काळाच्या भीषण तीव्रतेने तीस वर्षा नंतर या वास्तू सापडल्या आहेत. एवढेच नाही तर धरणाच्या काही दूरवरचा भागही कोरडा पडलाय.

दुष्काळात होरपळतोय अपर वर्ध्याचा धरण परिसर

सगळेच वरूणराजाच्या प्रतिक्षेत असताना हा परिसर दुष्काळाला तोंड देतोय.

अपर वर्धाचा धरण परिसर हा अमरावती आणि वर्धा सीमेवर अमरावतीच्या मोर्शी येथे स्थित आहे.

तीस वर्षांपूर्वी धरणनिर्मिसाठी अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील 24 गावातील 6 हजार पेक्षा जास्त लोकांनी आपल्या जमिनी,घरे सोडत स्थलांतर केले होते.

मात्र महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील एकूण 4 हजार हेक्टर पाण्याखाली असलेली जमीन दूरपर्यंत कोरडी पडली आहे.

त्याचबरोबर पाण्याखाली गेलेल्या करजगावातील हनुमान मंदीर आणि शिवमंदीर दुष्काळाने उघडे पडले आहेत.

विशेष म्हणजे मंदिरातील मुर्त्या,घराचे ओटे, विहिरी, तुटलेले खांब,पूर्वी धान्य ठेवायचे पेव, मुस्लिम धार्मिक स्थळे पाण्याअभावी दिसू लागली आहेत.

कधीकाळी तुडूंब पाण्याने भरलेला अपर वर्धाचा धरण आज वाळवंटासारखा दिसत आहे.

अमरावती जिल्ह्याला वरदान ठरलेल्या ह्या धरणाला पडलेली कोरड दुष्काळाची फक्त भीषणता दर्शवत आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री शंकराव चव्हाण यांच्या हस्ते पायाभरणी झालेले हे धरण मासेमारीमुळे शासनाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देत होता.

शिवाय हा व्यवसाय हजारो मजुरांना दोन वेळेस पोटभर जेवण देणारा होता.

मात्र दुष्काळामुळे धरणात पुरेसे पाणी नसल्याने हा मासेमारीचा व्यवसाय मंदावलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *