Sun. Apr 21st, 2019

अंधश्रद्धेचा बळी, पोटावर सळीनं दिले चटके

0Shares

मेळघाटमध्ये कुपोषनाने अनेक मुलांचा मृत्यू होत असताना अंधश्रद्धेतून देखील बालकांचा मृत्य होत असल्याचे समोर आले आहे. मेळघाटात नुकताच भूमक्याच्या उपचाराने एका बालकाचा मृत्यू झाला आहे.

डोमी येथील यशोदा पंकज बेठेकर या महिलेची 22 ऑक्टोबर रोजी हतरु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झाली, तिने 2 किलो 800 ग्राम वजनाच्या बालकाला जन्म दिला, दवाखान्यातून सुट्टी घेऊन घरी गेल्यावर या बालकाच्या पोटावर फुगारा आल्याने बेठेकर यांनी बालकाला गावातील भूमक्याकडे (भगत) नेले. या भूमक्याने बालकाच्या पोटावर गरम सळीनं चटके दिले यामुळे बालकाची प्रकृती बिघडली.

30 ऑक्टोबरला या बालकाला चुरणी येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता 20 मिनिटात त्याचा मृत्यू झाला. मेळघाटात बालक आजारी पडल्यास त्याला पोटावर चटके दिले जाते याला ‘डंबा’ असे म्हणतात.

मेळघाटात अनेक शासकिय व NGO काम करत असले तरी या घटनेनंतर आजही मेळघाटातील आदिवासींमध्ये अंधश्रद्धा कमी झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *