Sat. Sep 18th, 2021

उद्धव ठाकरे यांना खासदार नवनीत राणांचा सल्ला

खासदार नवनीत राणा यांनी केली मुख्यमंत्र्यांवर टीका…

अमरावती – कोरोनाच्या काळात राज्यात सध्या नवरात्राचा उत्सव सुरू आहे. संपुर्ण राज्यात
देवीची मंदिरे बंद असल्यानं  मंदिरात कोणी जाऊन देवीचे दर्शन करू शकत नाही यामुळे जनता आणि काही राजकीय पक्ष भडकून आहे.  यापुर्वी देखील राज्यात मंदिर उघडी करा यासाठी अनेक प्रदर्शनं केली.आता यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चूक दुरुस्त करण्याचा खोचल सल्ला दिला आहे. मंदिरालय सुरू करायचे होती, परंतु ते मंदिरालयाच्या ‘म’ वरील अनुस्वार द्यायला विसरले आणि त्यांनी मदिरालय सुरू केले, अशी टीका खासदार राणा यांनी  मुख्यमंत्र्यांवर केली.

महाराष्ट्रात मंदिर सुरू करावी, यासाठी भाजप लोकप्रतिनिधींकडून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने झाली मात्र मंदिर उघडली नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील मुख्यमंत्र्यांना यांना एक पत्रही लिहिलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यापालाच्या पत्राचा गंभीरपणे विचार करू असं म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *