Jaimaharashtra news

आंध्रप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही महिला अत्याचाराविरोधात कडक कायदा करावा – नवनीत राणा

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. सोमवारी सकाळी ६. ५५ वाजता पीडितेने अखेरचा श्वास घेतला. ऑरेंज सिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी साडे सात वाजता मेडिकल बुलेटिनद्वारे ही माहिती दिली.

दरम्यान या जळीतकांडाविरोधात राज्यभरातून संतापाची लाट उमटत आहे. या घटनेविरोधात अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या नवनीत राणा ?

राज्य सरकारला एकच विनंती आहे. राज्यात आई बहिणी सुरक्षित राहण्यासाठी कडक कायदा आणायलाच पाहिजे. आंध्र प्रदेशमध्ये जर जगनमोहन रेड्डी करु शकतात, तर मग माझा महाराष्ट्र कशाची वाट पाहत आहे, असा सवाल नवनीत राणा यांनी केला.

हिंगणघाट प्रकरण : अपराध्याला शिक्षा दिल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही – मुख्यमंत्री

तसेच आंध्रप्रदेश सारखा कायदा महाराष्ट्रात आणायला पाहिजे, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. आरोपीला एक महिन्याच्या आत फास्ट ट्रक कोर्टात फाशीची शिक्षा द्यावी, हिच पीडितेला खरी श्रद्धांजली असेल, असं नवनीत राणा म्हणाल्या.

Exit mobile version